A meeting place for dynamic and careerist Maharashtra State Civil Service Officers.
राज्य महसूल क्रीडा व् सांस्कृतिक स्पर्धा 2010
पुणे : राज्य महसूल क्रीडा व् सांस्कृतिक सपर्धा २०१० चे उदघाटन रविवार दि १९ फेब २०१० रोजी बालेवाड़ी पुणे येथील भव्य मैदानावर मा महसूल मंत्री न नारायंरावाजी राणे यांचे हस्ते व् मा राज्यमंत्री महसूल यांचे उपस्थितीत झाले । सर्व महसूल अधिकारी व् कर्मचारी नेहेमीच्या कामाच्या गराड्यात हरवलेले सुर जुळवायचा प्रयत्न करताहेत । या निमित्ताने एक छोटेखानी बैठक घेनेत आली। सर्वच प्रश्नांवर चर्चा झाली। सर्वश्री बी डी शिंदे, श्री मालोदे , दिलीप शिंदे,अविनाश ढाकने , शेखर गायकवाड , श्री धर्माधिकारी , श्री अनिल पवार असे सुमारे ४५ अधिकारी हजर होते। श्री बी डी शिंदे यांचे महसूल विभागासाठी असलेले भरीव योगदान विचारात घेउन पुढील महाधिवेशानापर्यंत त्यांचा एक गौरव ग्रन्थ प्रकाशित करने हे जास्त ओचित्याचे ठरेल असे श्री शेखर गायकवाड यानी सुचविले व् सर्वानी त्याला मान्यता दिली। आता सर्वांसाठी आवाहन की त्यानी गौरव ग्रंथासाठी माझे किंवा श्री शेखर गायकवाड यांचे नावाने यशदा पुणे या पत्त्यावर पाठवावेत.
प्रल्हाद कचरे
Subscribe to:
Posts (Atom)