मत्ता व दायित्वे प्रपत्र भरणे सक्तीचे



पुणे: महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक ) नियम , 1979 च्या  नियम  19 चे  पोटनियम (1) व त्याखालील  टीप 3 अनुसार  प्रत्येक  अयिकारी/ कमणचा-याने  (गट-ड मधील  कर्मचारी  वगळता) कोणत्याही  सेवेतील/ पदावरील आपल्या  प्रथम नियुक्तीचे  वेळी व त्यानंतर  शासन विहित  करेल त्या त्या वेळी विहित नमुन्यामध्ये  आपले मत्ता व दायित्व याबाबतचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे. याबाबत याच ब्लॉगवर Important Themes या सदरात तपशिलवार माहिती दिली आहे व कार्यपद्धती नमूद केली आहे.



प्रल्हाद कचरे
अपर जिल्हाधिकारी

२००3 ते २००५ पर्यंत ची अपर जिल्हाधिकारी यांची जेष्टता सुची


पुणे : दि. १ जानेवारी २००३ ते ३१ डिसेंबर २००५ पर्यंत  ची अपर जिल्हाधिकारी यांची एकत्रित  जेष्टता सुची शासनाने प्रसिद्ध केली असून त्यावर काही आक्षेप असल्यास दोन महिन्याच्या कालावधीत दाखल करणेची मुदत देणेत आलेली आहे  . अपर जिल्हाधिकाऱ्याची जेष्ठता सुचीसाठी क्लिक करा 

जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांचे विषय वाटपात अंशत: बदल


पुणे: जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांचे विषयांचे वाटप आदेशात शासनाने अंशत: बदल केला असून विषय  क्रमाक 20 : अत्यंत तातडीने जवाहीर विहीर बांधणे विषयक अर्थसहाय्य कार्यान्वयन  व समजाय गांधी निराधार योजना  व , क्रमांक ३० - संजय गांधी योजना हे दोन विषय जिल्हाधिकारी यांचेकडे सोपविणेत आले आहेत .तर सामाजिक न्याय विभागाकडील विषय क्र. ४० ते ४४ अनुक्रमे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृधापाकाल निवृत्ती योजना व पूरक योजना ,  राज्याची श्रावणबाळ निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, व आम आदमी योजना या चार योजना जिल्हाधिकारी यांचेकडे सोपविनेत आल्या आहेत. 

जिल्हाधिकारी व  अपर जिल्हाधिकारी यांचे विषय वाटपात अंशत: बदल आदेशासाठी क्लिक करा 










मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमातील भूसंपादित जमिनीच्या बाबतीत शेतकरी विषयक तरतुद सुधारणा


पुणे: सन 2014 चा अधिनियम  क्रमांक-10 अन्वये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम , 1948 च्या कलम-63 मध्ये, मुंबई कुळवहिवाट व् शेतजमीन अधिनियम , 1950 च्या कलम-47 मध्ये व मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग  अधिनियम , 1958 च्या कलम-89, या कलमांच्या पोटकलम-(1) च्या स्पष्ट्टीकरणाऍवजी पुढील स्पष्ट्टीकरण दाखल करण्यात आले आहे.

स्पष्टीकरण:- शेतकरी या शब्द्प्रयोगात , “ज्या व्यक्तीची जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित केली असेल आहण अशा संपादनाच्या पारीणामी ती अशा  संपादनाच्या  दिनांकापासून भूहमहिन झालेली असेल अशी कोणतीही  व्यक्ती आणी  तिचे वारस यांचा समावेश होईल .

शासन परिपत्रकासाठी क्लिक करा 

मुंबई कुळवहिवाट व् शेतजमीन अधिनियम , 1950 दुरूस्ती अधिनियम साठी  क्लिक करा