प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित केलेले अधिकारी / कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित न राहील्यास त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याबाबत


राज्य सेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतिमान प्रशासन होण्याकरीता राज्यातील सर्व कर्मचारीवृंद यांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सर्व संवर्गातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पुढील नमुद केलेल्या टप्यांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे :

अ) पायाभुत प्रशिक्षण
ब) पदोन्न्तीनंतरचे प्रशिक्षण 
क) उजळणी प्रशिक्षण
ड) बदलीनंतरीचे प्रशिक्षण 
इ) नवीन विषयाची तोंडओळख प्रशिक्षण

त्याखेरीज यशदामार्फत कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने उपयुक्त विषयांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. 

प्रशिक्षणासाठी अधिकाऱ्यांची नावे न पाठविणाऱ्या संबंधित विभागप्रमुख / अधिकाऱ्याविरुध्द तसेच नामनिर्देशनानंतर प्रशिक्षणास उपस्थित न राहणाऱ्या प्रशिक्षणार्थीविरुध्द कारवाई करण्यासाठी राज्य आणि विभागीय स्तरासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून मा. मुख्य सचिव यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा व त्याखालील स्तरासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. 

मात्र तरीही प्रशिक्षणासाठी जाण्यास काही अधिकारी कर्मचारी इच्छूक नसल्याचे तसेच काही कार्यालय / विभागप्रमुख अधिकारी/कर्मचारी यांना कार्यमुक्त करीत नसल्याचे आढळून आले आहे. सबब आता सर्व मंत्रालयीन विभागांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत:

1.       प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी / कर्मचारी यांनी प्रशिक्षणासाठी सक्तीने उपस्थित रहाणे गरजेचे आहे. प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी / कर्मचारी यांना संबंधित विभागप्रमुख यांनी कार्यमुक्त करणे सक्तीचे राहील.
2.      प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी / कर्मचारी यांना काही अतिमहत्वाच्या कारणास्तव प्रशिक्षणास उपस्थित रहाणे शक्य नसेल तर त्याऐवजी पर्यायी अधिक-यांची नावे देणे संबंधित विभागांना सक्तीचे राहील.
3.      यापुढे दरवर्षी वेतनवाढ देतांना अधिकारी व कर्मचा-यांनी नेमून दिलेले प्रशिक्षण पूर्ण केले किंवा कसे याची पडताळणी करणे आवश्यक राहील.

एकत्रित परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रम...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परिक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्त होणाऱ्या गट अ मधील (1) उपजिल्हाधिकारी (2) पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त (3) सहाय्यक विक्रीकर आयुक्त (4) उप निबंधक सहकारी संस्था (5) उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (उच्चश्रेणी) (6) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा  (गट अ) (7) मुख्याधिकारी नगरपालिका / परिषद (8) अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क (9) तहसिलदार आणि (10) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच गट ब मधील (1)महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा  (गट ब) (2) कक्ष अधिकारी (3) सहायक गट विकास अधिकारी (4) मुख्याधिकारी नगरपालिका / परिषद (5) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (6) उप अधीक्षक, भूमीअभिलेख (7) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (8)सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क आणि (9) नायब तहसिलदार इत्यादी विविध 19 संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परिक्षा सन 2013 मधील शिफारसप्राप्त अधिकाऱ्यांपैकी गट अ मधील अधिकाऱ्यांसाठी यशदा, पुणे येथे तर गट ब मधील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वानामती, नागपूर येथे माहे जून 2014 पासून सुरु होत आहे.

नागरी सेवा मांडळ स्थापन करण्याबाबतचे आदेश- स्थगीती

पुणे: राज्य शासन सेवेतील गट अ, गट ब व गट क मधील अधिकारी / कर्मचाऱयाांच्या पदस्थापना, बदली 
याबाबत सक्षम प्राधिकाऱयास शिफारशी करण्यासाठी सर्वोच्च न्ययलयचे निर्णयानुसार   नागरी सेवा मांडळ स्थापन करण्याबाबतचे आदेश विविध  विभागानी  दि .31 जानेवारी, 2014 च्या शासन निर्णयान्वये दिले आहेत. सदर शासन निर्णयास पुढील आदेश होईपयंत  स्थगीती देण्यात आली  आहे.


उपजिल्हाधिकारी संवर्गाची दिनांक 01.01.2001 ते 31.12.2005 पर्यंतची एकत्रित प्रारुप अंतिम जेष्ठता सूची

शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, दिनांक 24.09.2009 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली उपजिल्हाधिकारी संवर्गाची एकत्रित तात्पुरती जेष्ठता सुची व उपलब्ध अभिलेख यांच्या आधारे दिनांक 01.01.2001 ते 31.12.2005 पर्यंतची दिनांक 01.01.2006 रोजीची स्थिती दर्शविणारी एकत्रित प्रारुप अंतिम जेष्ठता सूची पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली आहे.