A meeting place for dynamic and careerist Maharashtra State Civil Service Officers.
कायदा माहितीचा अन अभिव्यक्तिस्वतंत्र्याचा - क्लिक
पुणे: कायदा माहितीचा अन अभिव्यक्तिस्वतंत्र्याचा हे सर्वसमावेशक व् सर्वाना उपयुक्त ठरेल असे पुस्तक यशदा, पुणे यांचेमर्फत नुकतेच प्रकाशित करनेत आले आहे। माहितीचा अधिकार कायदा २००५ व् इतर दोन सुशासनाचे कायदे म्हणजे महाराष्ट्र शासकीय कामात विलंब करनेस प्रतिबन्ध करणेचा अधिनियम २००५ व् महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ असे अत्यंत महत्वाचे तिन कायदे, त्याखालिल नियम, शासन निर्णय, शासन आदेश, न्यायानिवाड़े इ. सह या पुस्तकामधे शासकीय अधिकारी व् कर्मचारी याना येनारया समस्या विचारत घेउन कायद्यातील तरतुदिप्रमाने लिहावे लागणारे पत्र व् अदेशांचे १६ नमूने समाविष्ट करनेत आले आहेत। शिवाय काय करावे, काय करू नये, यासह राज्य माहिती आयोगाचे निर्देश, न्यायालयाचे नियम, केंद्र शासनाचे नियम, अशी भरपूर उपयुक्त माहिती व् संदर्भासह हे पुस्तक सर्वसमावेशक झाले आहे। मधे मधे टाकलेल्या आकृत्या, तक्ते, टिपा व् सूचना इ। ने हे पुस्तक केवळ शासकीय अधिकारीच नव्हे तर नागरिक, स्वयंसेवी संस्था, मध्यमाचे प्रतिनिधि, विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, व् सर्व समाजघटक याना रंजक व् उपयुक्त ठरेल अशी आम्हाला खात्री वाटते । यशदाचे प्रकाशन विभागात ०२०-२५६०८१२७ या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळू शकेल।
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment