टप्पा १ : मानीव अभिहस्तांतरणासाठी संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे विहित
नमुना ७ मध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसह अभिहस्तांतरणाच्या मसुदा दस्तासहीत अर्ज करणे,
तसेच मानीव अभिहस्तांतरणाचा आदेश व प्रमाणपत्र दस्तासहीत प्राप्त करुन घेणे.
नमुना ७ मध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसह अभिहस्तांतरणाच्या मसुदा दस्तासहीत अर्ज करणे,
तसेच मानीव अभिहस्तांतरणाचा आदेश व प्रमाणपत्र दस्तासहीत प्राप्त करुन घेणे.
टप्पा २: मानीव अभिहस्तांतरणाचा मसुदा दस्त सर्व सदनिकाधारकांच्या मुद्रांक शुल्काच्या तपशीलासह
संबंधित जिल्ह्याच्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडून अभिनिर्णय
(Adjudication) करून घेणे.
संबंधित जिल्ह्याच्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडून अभिनिर्णय
(Adjudication) करून घेणे.
टप्पा ३: अभिनिर्णयाच्या (Adjudication) आदेशानंतर सदर दस्त संबंधित कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक (खरेदी- विक्री)
यांचे कार्यालयात नोंदणीकृत करुन घेणे.
यांचे कार्यालयात नोंदणीकृत करुन घेणे.
टप्पा ४ : नोंदणीकृत दस्तनुसार संबंधित नगर भूमापन अधिकारी यांचेकडे अथवा मंडल अधिकारी / तलाठी
यांचेकडे अभिलेखात (७/१२) नांव नोंदणीसाठी अर्ज करणे. संबंधित अधिकारी यांनी
मालमत्ता पत्र (Property Card) अथवा ७/१२ उता-यावर भोगवटादार म्हणून संस्थेचे नांव
नोंदविल्यानंतर मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईल.
यांचेकडे अभिलेखात (७/१२) नांव नोंदणीसाठी अर्ज करणे. संबंधित अधिकारी यांनी
मालमत्ता पत्र (Property Card) अथवा ७/१२ उता-यावर भोगवटादार म्हणून संस्थेचे नांव
नोंदविल्यानंतर मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईल.
सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे सदर कागदपत्रे उपलब्ध असतील तरच त्यांनी मानीव अभिहस्तांतरण
करण्याकरिता ऑनलाईन व ऑफलाईन (Hard copy) अर्ज सादर करावा.
करण्याकरिता ऑनलाईन व ऑफलाईन (Hard copy) अर्ज सादर करावा.
ऑफलाईन अर्जाची प्रत (Hard Copy) रु.२०००/- इतक्या रकमेच्या शुल्कासहित (कोर्ट फी स्टॅम्प स्वरुपात
किंवा ऑनलाईन भरली असल्यास त्याची पावती यासह) संबंधित जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था / सहनिबंधक सहकारी संस्था (सिडको) यांचेकडे व त्याचवेळी मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावी.
किंवा ऑनलाईन भरली असल्यास त्याची पावती यासह) संबंधित जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था / सहनिबंधक सहकारी संस्था (सिडको) यांचेकडे व त्याचवेळी मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावी.
डिक्लरेशनची प्रत.
iii) अर्जदार संस्थेचा तपशील व संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा/विशेष सर्वसाधारण
सभांमध्ये मानीव अभिहस्तांतरण करण्यासंदर्भात केलेल्या ठरावाची प्रत.
iv) मिळकत पत्रिकांचा तीन महिन्यांच्या आतील उतारा. (मालमत्ता पत्रक ७/१२ उतारा इ.)
v) संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिका धारकांची विहित नमून्यातील यादी.
vi) सहकारी गृहनिर्माण संस्थेने अभिहस्तांतरण करुन देण्यासाठी महाराष्ट्र वेश्म अधिनियम, १९७० अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस.
vii) नियोजन/सक्षम प्राधिकरणाने दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्र.
viii) संबंधित संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे तसेच सदर इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदा-या/दायित्वे स्विकारण्यास तयार असल्याचे तसेच मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर संबंधीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र घेण्यात यावे. (परिशिष्ट -५ प्रमाणे)
ix) रु.२०००/- ची कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाईन फी.
x) संस्थेची कागदपत्रे खरी असल्याबाबत अर्जदाराचे स्वप्रतिज्ञापत्र (परिशिष्ट-४ प्रमाणे)
२) ऑफलाईन अर्जासोबत (Hard Copy) जोडावयाची कागदपत्रेः) मानवी अभिहस्तांतरणाकरिता नमुना ७ मधील अर्ज. (वर नमूद केल्याप्रमाणे मुद्रांक शुल्कासह)
i) मानीव अभिहस्तांतरण क्रमांक (D.C.No.) प्राप्त झाल्याचा नमुना क्र.७ ची प्रत.
ii) संस्थेतील एका सभासदाच्या सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत व इंडेक्स २ किंवा
iii) सदनिकेच्या मालकी हक्काचा पुरावा जसे वारस प्रमाणपत्र, न्यायालयाचा हुकुमनामा किंवा
मृत्यूपत्र इत्यादी.
iv) विकासकाने मंजूर करुन घेतलेल्या रेखांकन (Layout) ची सक्षम प्राधिकरणाकडील अंतिम
मंजूर नकाशा प्रत.
(ब) मानीव अभिहस्तांतरणाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपध्दतीः
मानीव अभिहस्तांतरणासाठी महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम, १९६३ च्या कलम ११, पोटकलम ३ अन्वये नमूना ७ मध्ये संस्थेने संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरिता परिशिष्ट-३ मध्ये नमूद कार्यपध्दतीचा अवलंब करावा.
(क) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था / सहनिबंधक, सहकारी संस्था (सिडको) तथा सक्षम प्राधिकारी यांनी मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्याबाबत करावयाची कार्यपध्दत:-
उपरोक्त वरील (अ) मध्ये नमूद केलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडली असल्याची सक्षम प्राधिकारी यांनी प्रथम खात्री करावी व तद्नंतर खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
i) मानीव अभिहस्तांतरण अर्ज स्विकारताना ७/१२ व मिळकत पत्रिकेवरील संबंधित धारक हे दस्तऐवज लिहून देणारे धारक असतील त्यांना पत्त्यासह पक्षकार केले आहे आणि एकाच रेखांकनावर (Layout) अस्तित्वात असलेल्या इतर सर्व गृहनिर्माण संस्थांना तसेच कंपनी अपार्टमेंट इ. यांना पक्षकार केले आहे काय हे पहावे.
ii) वरीलप्रमाणे कागदपत्रे जोडली असल्याची खात्री झाल्यानंतर मोफा अधिनियम, १९६० व नियम, १९६४ मधील नियम १३(२) नुसार सर्व संबंधित पक्षकारांना सुनावणीची नोटीस काढावी.
iii) सुनावणीची नोटीस काढल्यानंतर सुनावणीच्या वेळी यामध्ये आणखी काही पक्षकार करुन घ्यावयाचे राहून गेले असल्यास अशी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांची खात्री झाली तर त्या सर्व संबंधितांना पक्षकार करून घेण्याविषयी अर्जदारास आदेशीत करावे.
iv) त्यानंतर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी हे सुनावणीचे कामकाज पूर्ण करतील. यामध्ये अर्जदाराने प्रत्यक्ष प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यास फॉर्म नं. १० ची नोटीस दिल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांचे आत अर्ज निकाली काढतील.
v) अर्ज निकाली काढण्यास सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागल्यास विलंबाच्या कारणासह जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी अर्ज निकालात काढतील.
vi) मानीव अभिहस्तांतरणाचे आदेश व प्रमाणपत्र पारीत करताना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था/ सहनिबंधक, सहकारी संस्था (सिडको) तथा सक्षम प्राधिकारी यांनी खालील बाबी विचारात घेऊन आदेश पारीत करावेतः
(१) एका भूखंडावर अनेक इमारती असतील व प्रत्येक इमारतीची स्वतंत्र सहकारी गृहनिर्माण संस्था असेल आणि त्यापैकी काही इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्यास, पूर्ण झालेल्या इमारतीचे मानीव अभिहस्तांतरण करताना अशा संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाच्या प्रमाणात जागेचे क्षेत्रफळ (Proportionate area) किंवा Ground Coverage किंवा Plinth area, तसेच मोकळी जागा, सामुदायिक सेवा सुविधा, रस्ते यांचेवर बांधकामाच्या प्रमाणात अविभक्त हिस्सा (Undivided share) वहिवाटीचा हक्क द्यावा.
(२) ज्या ठिकाणी टि.डी.आर. चा (TDR) वापर केला असेल अशा लेआऊट मधील इमारतींच्या बाबतीत मानीव अभिहस्तांतरण करताना Pinth व Appurtent area प्रमाणे अभिहस्तांतरण करावे.
(३) एकाच रेखांकनात (Layout) एकापेक्षा जास्त संस्था असतील व त्यापैकी फक्त एकाच संस्थेने असा अर्ज केला असेल तर, तसेच अर्जदार संस्थेच्या जमिनीची मोजणी करण्यास इतर संस्था सहकार्य करीत नसतील तर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांनी अर्जदार संस्थेस संबंधित संस्थेच्या बांधकामाचे नकाशे मंजूर करणा-या सक्षम प्राधिकरणाकडील नामतालिकेवरील वास्तुविशारदाचे मंजूर नकाशाप्रमाणे मोजणी करुन संस्थेच्या क्षेत्राबाबत अहवाल सादर करण्यास सूचित करतील.
या प्रमाणे कार्यवाही झाल्यावर दुय्यम निबंधक सदर दस्त जिल्हयाचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे सत्वर
तपासणीसाठी पाठवतील आणि तपासणीमध्ये उक्त दस्तऐवजास कमी मुद्रांक शुल्क दिल्याचे दिसून आल्यास,
सदर मुद्रांक शुल्क व त्यावर मुद्रांक अधिनियमानुसार होणारा दंड त्वरीत भरण्याचे दायित्व संबंधित संस्थेवर
राहील.
तपासणीसाठी पाठवतील आणि तपासणीमध्ये उक्त दस्तऐवजास कमी मुद्रांक शुल्क दिल्याचे दिसून आल्यास,
सदर मुद्रांक शुल्क व त्यावर मुद्रांक अधिनियमानुसार होणारा दंड त्वरीत भरण्याचे दायित्व संबंधित संस्थेवर
राहील.
ज्या प्रकरणामध्ये अभिनिर्णय करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकरणामध्ये संस्थेने मुद्रांक
शुल्काच्या देयतेच्या अनुषंगाने अभिनिर्णय करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे
खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहीलः
शुल्काच्या देयतेच्या अनुषंगाने अभिनिर्णय करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे
खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहीलः
No comments:
Post a Comment